चुलीचा भडका उडून वृद्धेचा मृत्यू

0

रत्नागिरी : तालुक्यातील भोके सोनारवाडी येथील वृद्धेचा चुलीत भडका उडाल्याने होरपळून मृत्यू झाला. ही घटना बुधवार, ९ सप्टेंबर रोजी पहाटे ५.३५ वा. सुमारास घडली. सुमती यशवंत देवरुखकर (७०, रा. भोके-सोनारवाडी, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या वृद्धेचे नाव आहे. बुधवारी सकाळी त्या राहत्या घरी चुलीवर चहा करण्यासाठी चूल पेटवत होत्या. त्यावेळी चुलीत भडका उडून त्यांच्या अंगावरील नायलॉन साडीने पेट घेतल्याने त्या गंभीर भाजल्याने नातेवाईकांनी त्यांना तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्या ७० टक्के भाजल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:13 PM 10-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here