मासेमारी व्यावसायावर कोरोनाचे संकट कायम

0

रत्नागिरी : मासेमारी हा कोकणातील प्रमुख व्यवसाय आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास 7500 कुटुंब ही मासेमारी या व्यवसायावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या अवलंबून आहेत. यातून दररोज कोटींची उलाढाल होते. पण, मार्चपासून लॉकडाऊननची घोषणा झाली आणि यावर अवलंबून असणारे हजारो हात बेरोजगार झाले. सारी उलाढाल ठप्प झाली. त्यानंतर ऑगस्टपासून पारंपरिक मासेमारी सुरू झाली खरी, पण मासे मिळेनात अशी परिस्थिती निर्माण झाली. शिवाय खलाशांची वाणवा देखील आहेच. आता मात्र चित्र काहीसं बदलत असल्याचं दिसून येत आहे. कारण, रत्नागिरी जिल्ह्यातून सध्या दररोज 15 ते 20 टन म्हणजेच जवळपास 1 कोटींची मासे युरोपीयन देशांकरता निर्यात केले जात आहे. परिणामी आता मासेमारीचं अर्थकारण सुधारण्यास मदत होणार आहे. सध्या मिळणारे मासे आणि त्यांची होणारी निर्यात ही समाधानाची बाब नक्कीच आहे. पण, खलाशांची वाणवा हा सध्या मोठा प्रश्न पर्सेसिन मच्छिमारांना भेडसावत आहेत. राज्यातील खलाशी परत येत असले तरी नेपाळ किंवा इतर राज्यातील खलाशी अद्याप देखील परत आलेले नाहीत. परिणामी अनेक पर्सेसिन नौका या किनारी उभ्या असल्याचं चित्र आहे. खलाशी मिळाल्यास मासेमारी आणि त्यावर अवलंबून असलेल्या उलाढालीला आणखी वेग येऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे .

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:20 PM 10-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here