ना. उदय सामंत – एक प्रतिभा संपन्न लोकप्रतिनिधी…

0

✍️ निरंजन म.सोनवणे पाटील चोपडा जि.जळगाव

नैतिकमुल्य, अनुशासन आणि जबाबदारी यांचा अतुलनिय संगम म्हणजे उदय सामंत…
कणखर व्यक्तीमत्व मृदूभाषा, संवाद
साधण्याची कला, प्रयत्नशील दृष्टी, वास्तवता हे सारे पैलू उदयजींमध्ये आढळून येतात…
समाजाच्या भावबंधनात हृदयाची स्पंदन सतत हेलकावत ठेवणा-या अनेक चांगल्या नेत्यांच्या रांगेत ना.उदयजी सामंत यांना स्थान…
महाराष्ट्र विधानभवना ना.सामंत साहेबांनी आपला चांगलाच प्रभाव सोडलेला दिसून येतो. २००४ ला वयाच्या २७ व्या वर्षी आमदार झाले तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांच्या विधायक कार्याने प्रभावित होऊन त्यांना अनेकदा चांगल्या पदावर काम करण्याची संधी त्यांनी स्वकर्तृत्वाने मिळवली.
वर्तुळाच्या मध्यबिंदूपासून जेवढ्या त्रिजा निघतात तेवढी माणसं प्रत्येकाच्या आयुष्यात येत जात असतात…परंतू ख-या अर्थाने मनाला भावलेल्या व्यक्तीमध्ये साहेब आहेत.
त्यांची माणसं जोडण्याची जोपासण्याची आणि कार्य करण्याची पध्दत अनेकांना भुरळ घालून जाते.
आपल्या मतदारसंघासह कोकणातील प्रश्न त्यांनी वेळोवेळी तर्कशुद्ध पध्दतीने मांडले.आपल्या विचारांची घणाघाती भाषण विधानसभेत मांडली. विकासाची भव्य स्वप्न पाहणारा नेता आणि ती सत्यात उतरवून दाखविणारा नेता म्हणून अल्पावधीतच कार्यक्षम नेता अशी ओळख निर्माण झाली.
विकास काय असतो तो सामंत साहेबच्या सहवासात आल्यानंतर समजले.विकासाची ज्योत सतत तेवत ठेवण्यासाठी सदैव कटिबध्द असणारे व्यक्तीमत्व नेहमीच धडपड सूरू असते.विकासाचा संकल्प सोडवून राजकारणात प्रवेश करणारे लोक खूपच कमी पाहिलेत…
समाजातील तळागाळाचा मनामनाचा शोध घेऊन जे जे करता येईल ते ते त्यांनी केलेले आहे. कर्तव्य पुर्तीसाठी झटणारा आमदार म्हणून संपूर्ण रत्नागिरीत त्यांची ओळख आहे…
त्यांची उच्च कोटीची विचारसरणी, प्रगल्भ ज्ञान आणि दिवसेंदिवस वाढत जाणारा अनुभव त्यांच्या विषयी सर्वकाही सांगून जातो…
आपल्या विरोधी माणसाच्या म्हणण्यातही काही तथ्य असते त्याला सुध्दा समजून घेणारी व्यक्ती ही सुध्दा महानच!
धर्म जात वंश भाषा या सर्वांच्या तुलनेत गुणवत्ता हीच जमेची बाजू ठरते…
आज त्यांची शिवसेनेने प्रवक्तेपदी निवड केली.
दादा मनापासून अभिनंदन 🌹
( वास्तविकतेव लिखाणातून व जनसेवेतून जो अलौकिक आनंद प्राप्त होता. रत्नागिरी सिंधूदुर्ग करांचे जे लोक प्रेम ओंजळीत आलं त्याची कृतज्ञता आपणास अर्पण…)
[ अबोल अनुबंध ]
निरंजन म.सोनवणे पाटील चोपडा जि.जळगाव ९४२११८४७१७

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
4:33 PM 10-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here