वाशिष्ठी, शास्त्री पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरु; महामार्गावर वाहनांच्या रांगा

0

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्ठी नदीवरील चिपळूण येथील पूल व संगमेश्वर येथील शास्त्री नदीवरील पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गुरुवारी या स्ट्रक्चरल ऑडिटच्या कामाला सुरुवात झाली. त्यामुळे हे दोन्ही पूल दुपारी 12 ते 4 या वेळेत बंद होते. त्यामुळे दुपारी बारा वाजल्यापासून सायंकाळपर्यंत या पुलावरील वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू होती. अवजड वाहने महामार्गावरच उभी करण्यात आली होती. त्यामुळे महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलीस कर्मचारी महामार्गावर लक्ष ठेवून होते.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:33 AM 11-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here