सावर्डे पंचक्रोशीत आ. निकम यांची डॉक्टरांसमवेत आढावा बैठक

0

चिपळूण : सावर्डे परिसरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम यांनी गुरुवारी सावर्डे, वहाळ पंचक्रोशीतील खासगी डॉक्टरांची बैठक आयोजित केली होती. यावेळी कोरोनाबाधित रुग्णांवर कशा पद्धतीने उपचार करायचे, त्याविषयीच्या मार्गदर्शक सूचना आणि अन्य प्रकारची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव यांनी दिली. बैठकीला सावर्डे पंचक्रोशीतील २९ डॉक्टर उपस्थित होते. आमदार शेखर निकम यांनी बैठकीत सांगितले की, सर्व खासगी डॉक्टरांना लागेल ते सहकार्य करू. कोरोनाला रोखण्यासाठी जे जे करता येईल, ते सर्वांनी एकत्र येऊन करू. सर्वांनी या विषयात गंभीरपणे काम करावे, अशी विनंती श्री. निकम यांनी केली. सावर्डे परिसरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता श्री. निकम यांनी एमबीए कॉलेजमधील जागा उपलब्ध करून दिली आहे. तेथे अॅन्टीजेन, अॅन्टीबॉडी तपासणी होणार आहे. ज्यांना काही लक्षणे आढळतील, त्यांनी तातडीने तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:59 PM 11-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here