भारत-जपानमध्ये महत्त्वपुर्ण लष्करी सहकार्य करार

0

नवी दिल्ली : भारत-जपानमध्ये महत्त्वपुर्ण करार झाला आहे. भारत-जपानमध्ये सैन्य दलांचा पुरवठा आणि सेवांच्या आदान-प्रदानबाबत करार झाला आहे. म्हणजेच युद्धाच्या स्थितीत भारत-जपान एकमेकांना लष्करी सहकार्य करतील. याआधी भारताने अमेरिका, फ्रान्स, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियासोबत असा करार केलेला आहे. भारतीय संरक्षण सचिव अजय कुमार आणि जपानचे राजदूत सुजुकी सतोशी यांनी म्युच्यूअल लॉजिस्टिक सपोर्ट अरेंजमेंटवर (एमएलएसए) स्वाक्षरी केली. भारत-जपानमध्ये झालेल्या या संरक्षण कराराला ऐतिहासिक मानले जात आहे. या करारानंतर पंतप्रधान मोदींनी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्याशी फोनवर देखील चर्चा केली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:35 PM 11-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here