रत्नागिरी जि. प. च्या सर्वसाधारण सभेत कंगना राणावत, अर्णब गोस्वामी यांचा निषेध

0

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज शुक्रवारी दुपारी दोन वाजता कै. शामराव पेजे सभागृहात आयोजित करण्यात आली होती. सभेच्या सुरूवातीला जिल्हापरिषद अध्यक्ष रोहन बने आणि बांधकाम सभापती महेश म्हाप यांनी अभिनेत्री कंगना राणावत आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या निषेधाचा ठराव मांडला. अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबईची तुलना पाकिस्तानशी केली होती तसेच मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केल्याने महाराष्ट्रात संताप व्यक्त होत आहे त्यांचे पडसाद आजच्या जिल्हापरिषदेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. तर मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्याचा एकेरी उल्लेख करणाऱ्या पत्रकार अर्णब गोस्वामीचाही जाहिर निषेध केला आहे. यावेळी उपाध्यक्ष महेश नाटेकर, महिला आणि बालकल्याण सभापती रजनी चिंगळे, शिक्षण सभापती सुनील मोरे, समाजकल्याण सभापती ऋतुजा जाधव, गटनेते उदय बने आणि इतर सदस्य उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
4:31 PM 11-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here