ग्रामीण भागात रात्रवस्ती गाड्या पुन्हा सुरू करण्याची मागणी

0

दापोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीत थांबलेली एसटीची चाके आता पुन्हा रुळावर येऊ लागली आहेत. मात्र ग्रामीण भागातील लोकांना तालुक्याच्या ठिकाणी गेल्यावर घरी परतण्यासाठी उशिराची गाडी नाही. त्यामुळे रात्रवस्तीची गाड्या पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे. कोरोनामुळे रात्रवस्तीच्या गाड्या बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या ग्रामस्थांना घरी परतण्यासाठी अद्याप बंद असलेल्या रात्रवस्तीच्या गाड्या सुरू केलेल्या नाहीत. त्यामुळे केळशी, मांदिवली, पन्हाळेकाजी, रूखीकोंढे या गाड्या पुन्हा सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी या भागातील प्रवाशांकडून केली जात आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:13 PM 11-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here