देवरुख राजाची मिरवणूक साधेपणाने

0

देवरुख : कोरोना काळातील सर्व अटी नियमांचे पालन करुन देवरुख हनुमान मंदिरात देवरुख पोलीस कर्मचारी व हनुमान मंदिर मित्रमंडळाने यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला. देवरुखचा राजा २१ दिवसांची सेवा घेवून शुक्रवारी त्याचे साधेपणाने विसर्जन करण्यात आले. शुक्रवारी संध्याकाळी देवरुखच्या राजाची विसर्जन मिरवणुक स्टेट बँक रोड, बाजारपेठ, खालची आळी या मार्गाने साधेपणाने नेण्यात आली. सत्पलिंगी नदीमध्ये गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात देवरुखच्या राजाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:24 AM 12-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here