आदित्य ठाकरे यांनी केली आरेच्या जंगलाची पाहणी

0

मुंबई : मुंबई शहराच्या मध्यभागी असलेल्या आरे जंगलाला शुक्रवारी पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. आरेमधील 600 एकर जागा जंगल म्हणून घोषित केली आहे. पर्यावरणाचे रक्षण व पर्यटनाच्या विकासासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या परिसराचा दौरा केला. यावेळी पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, वन विभागाचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर, अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) सुनिल लिमये, दुग्धविकास आयुक्त भांगे उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांनी वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिक वल्सा नायर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील सोबत मालाड (पश्चिम) मधील एरंगळ येथील एमटीडीसीच्या जागेची पाहणी केली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:35 AM 12-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here