घरगुती वादातून जावई-सासऱ्यामध्ये हाणामारी

0

राजापूर : येथील नाटे, कोकरीवाडी येथे घरगुती वादातून जावई तसेच सासऱ्याने एकमेकांस मारहाण केल्याप्रकरणी नाटे पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार देण्यात आली आहे. मारहाणीची ही घटना गुरुवार १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.१० वा. सुमारास घडली. रुपेश रवींद्र लांजेकर, चंदन रविंद्र लांजेकर (दोन्ही रा. कोकरीवाडी, राजापूर) आणि रवींद्र यशवंत खानविलकर, चंद्रकांत यशवंत खानविलकर (दोन्ही रा. तेरवण, राजापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी रुपेश लांजेकरने दिलेल्या तक्रारीनुसार, त्याच्या पत्नीचे एका तरुणाशी प्रेमसंबंध आहेत.त्यामुळे त्याने याची माहिती पत्नीच्या माहेरी सासरा रवींद्र खानविलकर व त्यांचा भाऊ चंद्रकांत खानविलकर यांना सांगितली.तेव्हा हे दोघे तिला माहेरी घेउन जाण्यासाठी आले असता रुपेशचा भाऊ चंदन याच्याशी त्या दोघांनी वादविवाद घातला.तेव्हा रुपेश व त्याची आईमध्ये पडली असा त्या दोघांनी या तिघांनाही धक्काबुक्की करीत लोखंडी सळीने मारहाण केली. याबाबत रवींद्र खानविलकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रुपेश संशयातून आपल्या मुलीला त्रास देत असल्याने ते मुलीला माहेरी नेण्यासाठी भावासह रुपेशच्या घरी गेले होते.त्यावेळी जावयाचा भाऊ चंदन याने त्यांच्याशी वाद घालत रवींद्र खानविलकर यांचा भाऊ चंद्रकांत याची कॉलर पकडून हातांच्या ठोशांनी मारहाण केली. यावेळी रवींद्र हे पडले असता रुपेशने लाकडी काठीने त्या दोघांनाही मारहाण केली.याप्रकरणी अधिक तपास महिला पोलिस चव्हाण करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:57 PM 12-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here