महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीसाठी भरारी पथकं, आरोग्यमंत्र्यांचे आदेश

0

जालना : महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील लुबाडणूक टाळण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्याचे आदेश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. रुग्णांची होणारी लूट थांबवण्यासाठी राज्य सरकारनं एक परिपत्रक जारी केलं आहे. यामध्ये योजनेचा पूर्ण अभ्यास करून रुग्णालयांच्या तपासणीसाठी भरारी पथकांची नेमणूक करावी असा आदेश राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. शनिवारी राजेश टोपे यांच्या हस्ते जालन्यात कोरोना हॉस्पिटलमध्ये 40 बेडच्या अतिदक्षता विभागाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:50 PM 12-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here