वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत मानसी जोशीने सुवर्ण पदक पटकावले

0

नवी दिल्ली : वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत पी. व्ही. सिंधू पाठोपोठ मानसी जोशीनेही सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. तिने वर्ल्ड पॅरा – बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत तीन वेळच्या एसएल ३ प्रकारातील विजेत्या परुल परमारचा २१-१२, २१-७ असा पराभव केला. मानसीचे हे पॅरा – बॅडमिंटन स्पर्धेतील पहिले सुवर्ण पदक आहे. या विजयानंतर मानसीने प्रतिक्रिया देताना ‘ मी यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. दिवसातून तीनवेळा सराव करत होते. त्यामुळे माझे वजनही कमी होण्यास मदत झाली. मी माझा बराच वेळ जीममध्ये घालवत होते. मी पॅरा – बॅडमिंटन स्पर्धेत २०१५ पासून खेळत आहे. आता माझे सुवर्ण पदक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाले. मानसीचा २०११ मध्ये अपघात झाला होता. तिला एका ट्रकने उडवले होते. त्यात तिला तिचा डावा पाय गमवावा लागला होता. १० तासाच्या शस्त्रक्रियेनंतरही डॉक्टरांना तिचा पाय वाचवण्यात अपयश आले.त्यानंतर तिने खचून न जाता २०१२ ला कृत्रिम पायाच्या सहाय्याने चालण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिने इंटर कंपनी बॅडमिंटन स्पर्धेत सहभाग घेतला. त्यात तिने सुवर्ण पदक जिंकले. यामुळे मानसीचा आत्मविश्वास दुणावला. तिने स्कुबा डायव्हिंगचेही प्रशिक्षण घेतले. 


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here