‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेत सर्वांचा सहभाग हवा : मुख्यमंत्री

0

मुंबई : आपल्या सर्वांच्या सहकार्याने कोरोना विरुद्धच्या युद्धात निर्णायक विजय मिळविण्याचे राज्य सरकारचे लक्ष्य आहे. यासाठी राज्यात “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेद्वारे राज्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न शासन करणार असून यात लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिक यांचा सहभाग महत्वाचा ठरणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. राज्यातील जनतेशी रविवारी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी समाजमाध्यमांद्वारे संवाद साधला. यावेळी विविध मुद्द्यांवर भाष्य करत यावेळी मुख्यमंत्री यांनी सणासुदीच्या काळात सर्वधर्मियांनी दाखविलेल्या संयमाबद्दल धन्यवाद दिले. कोरोनाचे संकट वाढत असतांना पुनश्च हरिओम म्हणत जनतेचे आयुष्य पूर्वपदावर आणण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असेही ते म्हणाले

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:31 AM 14-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here