‘भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन ह्यांनी लहान तोंडी मोठा घास घेवू नये’

0

▪️ युवासेना रत्नागिरी तालुका युवधिकारी तुषार साळवी यांचा सणसणीत टोला

रत्नागिरी : भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन ह्यांनी लहान तोंडी मोठा घास घेवू नये, आताच आपली नव्याने नेमणुक झाल्याने प्रसिद्धी साठी तुम्हीही आता शिवसेनेचाच उपयोग करताय हे लक्षात येतंय, असा टोला युवासेना रत्नागिरी तालुका युवधिकारी श्री तुषार साळवी यांनी लगावला आहे. शिवसेना शहर प्रमुख बिपिन बंदरकर यांनी मांडलेली भूमिका योग्यच असून ही त्यांची वैयक्तिक प्रतिक्रिया नसून पक्षाची भूमिका त्यांनी मांडली आहे. अनिकेत पटवर्धन हे माजी जिल्हाध्यक्ष तसेच माजी आमदार बाळ माने यांचे एकदम विश्वासु सहकारी होते, मग बाळ माने यांना कशा प्रकारे पदावरुन दूर सारण्यात आले याचे आत्मपरीक्षण अनिकेत पटवर्धन यांनी करावे अन् मग तुम्हाला सर्व उत्तरे मिळतील अशी गुगलीही तुषार साळवी यांनी टाकली. अनिकेत पटवर्धन आपण हुशार आहात, सुज्ञ आहात मात्र माणसं ओळखायला आपण शिकले पाहिजे तंरच तुम्ही तुमच्या कपटी पक्षाच्या प्रवाहात टीकू शकाल, असा मी तुम्हाला मित्रत्वाचा सल्ला देतो, असेही तुषार साळवी म्हणाले. खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका तसेच अनेक ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात असताना तुमची टिका म्हणजे हास्यास्पद असल्याचेही ते म्हणाले. नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत ज्यांना स्वतःच्या आजु बाजुची मतं नाही पडली त्यांच्यासाठी आपण ढाल बनताय म्हणजे तुम्ही खरोखरच ‘डेरिंगबाज’ आहात असा जबरदस्त टोला लगावतना ते पुढे म्हणाले की, दीपक पटवर्धन पतसंस्था उत्तम सांभाळतात तेच त्यांनी पहावं कारण एसी मध्ये बसून तेच काम योग्य आहे. पतसंस्था चालवणे आणि पक्ष चालवणे ह्यात जमीन आसमानाचा फरक आहे, नाहीतर एक तंर तुमचे अथवा पक्षाचे ‘पतन’ नक्कीच आहे हे ध्यानात ठेवा..! बिपीन बंदरकर हे आमचे शिवसेनेचे रत्नागिरी शहरप्रमुख आहेत,बंदरकर यांचे शहरासाठी काय योगदान ? हे आपले विधान म्हणजे तुमची राजकीय अपरिपक्वता आणि आपण अजून बालिश आहात हे दाखवून देणारे आहे. गेली 25 वर्ष राजकारणात काम करताना श्री बंदरकर यांनी त्यांच्या कार्यकौशल्याने अनेक कार्यकर्ते आणि मित्रपरिवार जोडला आहे,नेहमीच अडचणीच्या वेळी रात्री अपरात्री धावून येणारी व्यक्ती म्हणून सर्व लोक आज त्यांना ओळखतात आणि हे आपल्याला आणि आपल्या पक्षातल्या सहकार्यांना देखील चांगलेच माहीत आहे ,आपल्याला माहीत नसेल तर आपण नगरपरिषदेमधल्या आपल्या पक्षातल्या नगरसेवकाना विचारून पाहावे. राहिला मुद्दा ‘ई बुक’चा..! तंर अशी बुक तयार करून महामारीच्या काळात चमकूगिरी करायचा पिंड शिवसेनेचा नाही, समाज कार्य आम्हाला नवीन नाही, जे नवखे असतात त्यांना त्याची गरज आहे. आमच्या ‘प्रोग्रेस कार्ड’वर जनता ‘साईन’ करते आणि त्याचा ‘रिझल्ट’ तुमच्या समोर आहे, त्यामुळे असल्या बुक आम्हाला तयार कराव्या लागत नाहीत, असा घणाघात त्यांनी केला.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
11:20 AM 14-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here