घरफोडी करून १ लाख ९० हजारांचा ऐवज लंपास

0

साखरपा : दाभोळे येथे राहते घर फोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील १ लाख २० हजारांची रोख रक्कम आणि ७० हजारांचे सोन्याचे दागिने मिळून १ लाख ९० हजारांचा ऐवज लंपास केला. घरातील कुटुंब बाहेर गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी हा डल्ला मारला. दाभोळे बाजारपेठेतील राजाराम मारुती मांगलेकर (वय ६०) हे गुरुवारी संध्याकाळी पाच वाजल्याच्या सुमारास लांजा येथे राहणाऱ्या आपल्या मुलाकडे कुटुंबासह गेले होते. शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास ते परत आले असता त्यांना आपल्या घराचा दरवाजा उघडा दिसला असता घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या सगळ्या प्रकरणात पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक निशा जाधव आणि सहायक पोलिस निरीक्षक तुषार पाचपुते करत आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:49 AM 14-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here