वरवेली : आबलोलीसह संपूर्ण गुहागर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. आबलोली पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसताच वेळीच निदान होण्यासाठी आबलोलीमध्ये अँटिजेन टेस्टची सुविधा उपलब्ध करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन बाईत यांनी केली आहे. यासाठी प्रशासनाला आवश्यक असलेली इमारतही उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:35 PM 14-Sep-20