चिपळूण : महामार्ग चौपदरीकरणाच्या भूसंपादनामध्ये रेखांकनात तफावत आढळल्याने नागरिकांनी आक्षेप घेतला व शहरात सुरू असलेले काम थांबविले. या पार्श्वभूमीवर चिपळूण तहसील कार्यालयात सोमवारी बैठक घेण्यात आली व पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या ताब्यातील अतिक्रमणे काढावीत, असा निर्णय घेण्यात आला. शहरातील चौपदरीकरणासाठी झाडे व बांधकामे तोडण्यासाठी महामार्ग विभागाच्या ठेकेदार कंपनीने काम सुरू केले होते. मात्र, रेखांकनामध्ये तफावत आढळल्यानंतर येथील नित्यानंदभागवत,संजयतांबडेवअन्य नागरिकांनी आक्षेप घेतला. जोपर्यंत रेखांकनामध्ये स्पष्टता येत नाही तो पर्यंत काम होऊ देणार नाही असा पवित्रा घेतला. या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि.२६)दुपारी तहसीलदार जीवन देसाई, नगर परिषद, चेतक कंपनीचे अधिकारी व नागरिकांची संयुक्त बैठक झाली. या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी गणेशोत्सवानंतर बैठक घेण्याचे ठरले.सरुवातीला महामार्गावर झालेली अतिक्रमणे काढावीत गणेशोत्सवापर्यंत कुठलेही बांधकाम तोडू नये संयुक्त पाहणीमध्ये व नागरिकांच्या उपस्थितीती भूसंपादनाचे रेखांकन करुन जागा ताब्यात घ्यावी शहरातील महामार्गाचा आरखडा प्रसिद्ध करावा ज्या जागांचा मोबदला देण्यात आलेला नाही त्या जागेतील बांधकामाला हात लावू नये, या संदर्भात निर्णय घेण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने यांनी नागरिकांची बाजू मांडली. तसेच यानंतर महामार्ग बाधीत नागरिक न.प.त गेले. त्या ठिकाण नागरिकांच्या नळ जोडण्या कशा देणार, पाण्याची पाईपलाईनची व्यवस्था कशी करणार या संदर्भार न.प.मध्ये बैठक घेण्यात आली.
