जुगारप्रकरणी १७ जणांविरोधात गुन्हा दाखल

0

खेड : तालुक्यातील भरणेनाका येथील बंदिस्त गाळ्यात आणि चिंचघर येथील जंगलात या दोन वेगवेळ्या ठिकाणी बेकायदा जुगार खेळणाऱ्या १७ जणांविरोधात खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून ५३ हजार ६२ रुपयांची रोख रक्क्मही जप्त करण्यात आली. या दोन्ही कारवाया शनिवार १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ आणि सायंकाळी ५.३० वा.सुमारास करण्यात आल्या. दिनकर गाडीलोहार(३४),सतिश धुमाळ(५१), प्रवीण सकपाळ (४३), हनुमान दंडगोळे (४५), गोविंद शेवाळे (६०) आत्माराम गोवळकर (४६),सुधीर जोगले(४०),यशवंत कदम(४७),कृष्णा कुन्हाडे (३२),अनंत सुर्वे(३५), रुपेश शिगवण(४०), रमेश धोत्रे(३०),पांडुरंग देवळे (६०), दत्ताराम भिलारे(३९),कृष्णा शिल्पी(४०), महेश शिदे (३२).महानंद बिसवराज(३५. सर्व रा .खेड)अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी अधिक तपास खेड पोलिस करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:05 PM 14-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here