रत्नागिरीत गळफासाने तरुणाची आत्महत्या

0

रत्नागिरी : प्रतिनिधी शहरानजीकच्या चर्मालय येथील स्टेट बँक कॉलनी येथे तरुणाने अज्ञात कारणातून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी ३ वा. सुमारास उघडकीस आली. राजू गुंडू धोत्रे (३८, रा. स्टेट बँक कॉलनी, रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. राजू धोत्रे हा बहीण आणि तिच्या दोन मुलांसह राहात होता. मंगळवारी सकाळी त्याची बहीण व दोन मुले बाहेर गेले असताना राजूने सिलिंग फॅनच्या हुकला नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. दुपारी ३ वा. सुमारास त्याची बहिण घरी परतली असता तिला घराचा दरवाजा बंद दिसला, तिने दरवाजा ढकलला असता तिला राजू गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. तिने आरडाओरडा करताच आजबाजूच्या शेजाऱ्यांनी धाव घेत शहर पोलिसांना याची खबर दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला.अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here