संयुक्त राष्ट्रात चीनला झटका; ECOSOC चा सदस्य बनला भारत

0

जिनिव्हा : सीमेपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनला चांगलाच झटका बसला आहे. आता भारताने चीनवर मात केल्याचे दिसून येत आहे. चीनवर मात करत आर्थिक आणि सामाजिक परिषदेची (ECOSOC) संस्था ‘युनायटेड नेशन कमिशन ऑफ ऑन स्टेटस ऑफ वुमन’ या संस्थेचा सदस्य म्हणून भारताची निवड करण्यात आली. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरूमूर्ती यांनी याबाबत माहिती दिली. भारत, अफगाणिस्तान आणि चीन या तीन देशांनी कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनसाठी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत भारताने बाजी मारली आहे. त्यामुळे चीनला जोरदार झटका बसला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

प्रतिष्ठीत ECOSOC चे सदस्यत्व भारताने मिळवले आहे. भारताची कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनच्या (सीएसडब्ल्यू) सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. भारत, अफगाणिस्तान आणि चीन या तीन देशांनी कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनसाठी निवडणूक लढवली होती. यामध्ये भारत आणि अफगाणिस्तानने ५४ सदस्यांच्या मताद्वारे विजय मिळवला. यामध्ये चीनला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. चीनला कमी मते मिळालीत. बीजिंग कॉन्फरन्स ऑन वुमनचे (१९९५) यावर्षी २५ वे वर्ष आहे.चीनकडून सध्या सीमेवर कुरापती काढण्यात येत आहे. अशीवेळी चीनला भारताकडून पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, या विजयानंतर भारत पुढील चार वर्षांसाठी या आयोगाचा सदस्य असेल. २०२१ ते २०२५ या कालावधीसाठी भारत संयुक्त राष्ट्राच्या कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनचा सदस्य असणार आहे.आमच्या सर्व प्रयत्नांमधील समानता आणि महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देणअयासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे महत्त्वपूर्ण समर्थन देते. आम्ही सदस्य देशांना समर्थन दिल्याबद्दल धन्यवाद देतो, अशी प्रतिक्रिया भारताचे टीएस. तिरूमूर्ती यांनी दिली. त्यांनी यासंदर्भात ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:22 AM 15-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here