वाहतुक नियमांचे उलंघन करणाऱ्यांवर आता अत्याधुनिक कॅमेराद्वारे होणार कारवाई

0

◼️ अत्याधुनिक यंत्रणेचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांच्या हस्ते उद्घाटन

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर परिसरात वाहतूक नियमांचे उलंघन करणाऱ्यांची आता खैर नाही. वाहतूक नियमांचे उलंघन करणाऱ्या वाहनचालकांवर आता वाहतूक पोलीस कंट्रोल रूममधून नजर ठेवणार आहेत. यासाठी अत्याधुनिक असे ३६० डिग्रीमध्ये फिरणारे कॅमेरे पोलीस प्रशासनाने मारुती मंदिर येथे बसवले आहेत. या अत्याधुनिक कॅमेराद्वारे मारुती मंदिर पासून सुमारे जुना माळ नाका इथपर्यंत अंतरावर लक्ष ठेवता येणे शक्य होणार आहे. अत्याधुनिक यंत्रणेद्वारे वाहतूक नियमांचे उलंघन करणाऱ्यांवर याद्वारे कारवाई केली जाणार आहे. म्हणजे आता नाक्यावर पोलीस जरी नसले तरी वाहनचालकांना शिस्तीतच जावे लागणार आहे. हळूहळू अशा पद्धतीने शहराच्या मुख्य नाक्यांवर हे कॅमेरे बसवले जाणार असून यामुळे गुन्ह्यांची उकल करण्यास देखील पोलिसांना मदत मिळणार आहे. सीसीटीव्ही बेस इ चलानाची सोय. शहरात 12 ठिकाणी असे कॅमेरे बसवले जाणार आहेत. या अत्याधुनिक यंत्रणेचे आज जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांच्या हस्ते, वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
11:52 AM 15-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here