आजारपणाला कंटाळून इसमाची आत्महत्या

0

लांजा : शिपोशी बौध्दवाडी येथील विलास कांबळे या ५२ वर्षीय व्यक्तीने गावाशेजारील जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिपोशी बौध्दवाडी येथील विलास पांडुरंग कांबळे (वय ५२) हे गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी होते. या आजारपणाला कंटाळून आलेल्या नैराश्यामुळे त्यांनी रविवारी (दि. १३ सप्टेंबर) ला सकाळी ७ ते दुपारी १२ या कालावधीत गावाशेजारील जंगलात एका झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत अमित अनंत कांबळे यांनी लांजा पोलिस ठाण्यात याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:41 PM 15-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here