अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी RBI हरेक महत्त्वाचे पाऊल उचलणार : शक्तिकांत दास

0

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बुधवारी म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या महामारीमुळे संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत. आपल्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी जे काही पाऊल उचलण्याची गरज आहे त्यासाठी रिझर्व्ह बँक पूर्णपणे तयार आहे. उद्योग संघटना फिक्कीच्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले की,’अर्थव्यवस्थेतील प्रगती अद्याप पूर्ण वेगावर पोहोचलेली नाही, ती हळू हळू प्रगती करेल.’ यावेळी त्यांनी खासगी क्षेत्राला अर्थव्यवस्थेच्या प्रगतीची गती वाढविण्यासाठी योगदान देण्यास सांगितले. दास म्हणाले की,’RBI कडून मोठ्या प्रमाणात रोख रकमेच्या उपलब्धतेमुळे सरकारला कमी दराने आणि कोणत्याही अडचणीशिवाय मोठ्या प्रमाणात कर्ज घेण्याची खात्री मिळाली आहे. मागील दशकातील ही पहिलीच वेळ आहे जेव्हा कर्ज घेण्याची किंमत इतकी खाली आली आहे.’ ते म्हणाले की,’ कमी कॅशच्या उपलब्धतेमुळे सरकारची उधारीची किंमत अत्यंत कमी राहिली आहे आणि सध्या बॉन्डचे उत्पन्न हे गेल्या दहा वर्षांच्या खालच्या पातळीवर आहे.’ दास पुढे म्हणाले की,’ जीडीपी डेटा अर्थव्यवस्थेतील कोविड -१९ चा उद्रेक दर्शवितो.’ कोविड -१९ नंतर अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरने खाजगी क्षेत्राला संशोधन आणि नाविन्य, अन्न प्रक्रिया आणि पर्यटन क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावण्यास सांगितले आहे. पर्यटन क्षेत्रात विपुल शक्यता असून खाजगी क्षेत्राने त्याचा लाभ घ्यावा असे ते म्हणाले आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:05 PM 16-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here