रत्नागिरी : तब्बल ८२ हजार रूपयांचे दोन स्मार्ट टिव्ही लांबविणाऱ्या तिघांच्या लातूर येथून मुसक्या आवळण्यात रत्नागिरी शहर पोलिसांना यश आले आहे. मंगळवारी न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अमित सुदाम मखिजा (२६), सुमित सुदाम मखिजा (२४, दोघेही रा.कोल्हापूर) आणिगजानन विलास माने (४२, रा. सांगली) अशी अटक करण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत.काही दिवसांपूर्वी मारूती मंदीर येथील समर्थ डिजिटल शॉपींग सेंटर येथे ही घटना घडली होती. दिनेश कुकरेजा नामक एक तरुण समर्थ डिजीटल सेंटरमध्ये आला होता. सुमारे ८२ हजार रूपये इतके बिल आपण ऑनलाईन देतो असे सांगितले. परंतु, प्रत्यक्षात खात्यावर पैसे जमा झाली नव्हती. त्यानंतर त्यांनी तातडीने शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती.
