दोन किलो सोन्याच्या व्यवहारासाठी बोलावून 59 लाख रुपये लुटले ?

0

खेड : दोन किलो सोने विक्रीच्या व्यवहारासाठी खेड येथील एका पेट्रोल पंपा जवळील जंगलात बोलावून 59 लाख रुपयांची रोख रक्कम लुटल्याची घटना घडली अशी जोरदार चर्चा खेड मध्ये सुरू आहे. एका बँकेचा म्यानेजर व एक सोनार 59 लाख रुपये घेऊन या जंगलात गेले होते अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. येथे व्यवहारासाठी गेल्यावर चोरट्यांनी सोने न देताच या दोघांना मारहाण करून रक्कम पळवली असे बोलले जात आहे. मात्र हे इतके पैसे आले कुठून ? नक्की अशी घटना घडली की नाही ? की हा केवळ बनाव आहे ? या प्रशांची उत्तरे सध्या खेड पोलीस शोधत आहेत. या घटनेबाबत अनेक कथा चर्चिल्या जात असून पोलीस तपासात आता नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
9:06 PM 16-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here