‘मेर्वी’ येथील बिबट्याला पकडण्यासाठी दोन पथके तैनात करणार

0

रत्नागिरी : वन विभागाला सतत चकवा देणाऱ्या मेर्वी परिसरातील बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून नव्याने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अनेक उपाययोजना करूनही आणि पकडण्यासाठी विविध पथके आणूनही हा बिबट्या वन खात्याच्या जाळ्यात अनेक महिन्यांपासून आलेला नाही. बिबट्याला पकडण्यासाठी पुणे आणि मुंबईतून आलेल्या वन खात्याची पथके माघारी फिरल्यावर बिबट्या परत ग्रामस्थांवर हल्ला करीत आहे. यामुळे या बिबट्याला पकडण्यासाठी वनखाते आता परत एकदा प्रयत्न करणार आहे. तेथील जंगलात पुन्हा कॅमेरे आणि पिंजरा लावण्यात येणार आहे. कोल्हापूर येथून एक पथक येणार असून रत्नागिरीचे एक अशी दोन पथके तैनात करण्यात येणार आहे. या मार्गावर चौकी तयार करण्यात येणार आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:36 AM 17-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here