आंजर्ले नळपाणी योजनेच्या कामाचे भूमिपूजन

0

दापोली : तालुक्यातील आंजर्ले नळपाणी योजनेचा प्रारंभ करण्यात आला आहे. दापोलीचे आमदार योगेश कदम यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या ८१ लाख रुपये खर्चाच्या या नळपाणी योजनेच्या कामाचे भूमिपूजन झाले. शासकीय निधीतून करण्यात येणाऱ्या या नळपाणी योजनेमुळे आंजर्लेवासीयांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. आंजर्ले ग्रामस्थांचा पाणी प्रश्न निकाली निघावा, यासाठी योगेश कदम यांनी आमदार होण्यापूर्वीच प्रयत्न सुरू केले होते. तत्कालीन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या माध्यमातून त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या होत्या. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आणि नळपाणी योजनेला मंजुरी मिळाली. त्यासाठी आवश्यक असलेला ८१ लाखाचा निधीदेखील मंजूर झाला. काही महिन्यांपूर्वीच या कामाची वर्कऑर्डर निघाली होती. मात्र करोना लॉकडाउनमुळे योजनेच्या प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली नव्हती. तांत्रिक अडचणीमुळे रखडलेले काम लवकर सुरू व्हावे, यासाठीही आमदार श्री. कदम यांनी पाठपुरावा केला आणि योजनेचे भूमिपूजन झाले. यावेळी माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, माजी समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, माजी बांधकाम व आरोग्य सभापती चंद्रकांत ऊर्फ आण्णा कदम, दापोली शिवसेना तालुका प्रमुख प्रदीप सुर्वे, तालुका संघटक उन्मेष राजे, जिल्हा नियोजन समिती सदस्य नीलेश शेठ, जिल्हा परिषद सदस्य रेश्मा झगडे, सुनील दळवी, शिवसेना शाखाप्रमुख चेतन सुर्वे, स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:56 AM 17-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here