बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी

0

मुंबई : बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या योजनेबद्दल माहिती दिली आहे. या योजनेसाठी १२५ कोटी रुपये लागणार आहेत. रस्त्यावर होणाऱ्या अपघातात तातडीने उपचार व्हावेत यासाठी ही योजना असल्याचं राजेश टोपे म्हणाले. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेत ७४ पॅकेज असतील, अपघातानंतर मोफत उपचार मिळावेत, यासाठी ही योजना सुरू करण्यात येत आहे. यासाठी राज्यातल्या अनेक रुग्णालयांचा समावेश केला जाईल. तसंच घरातील अपघात आणि रेल्वे अपघात यांचा या योजनेत समावेश नसेल, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेतील तरतुदी:
१) बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेत पहिल्या ७२ तासांसाठी जवळच्या रुग्णालयांमधून उपचार करण्यात येतील.
२)सुमारे ७४ उपचार पद्धतीतून ३० हजार रुपयांपर्यंतचा खर्च मोफत केला जाईल.
३)अतिदक्षता विभाग व वॉर्डामधील उपचार, अस्थिभंग तसेच रुग्णालयाच्या वास्तव्यातील भोजन याचा समावेश यात असेल.
४)औद्योगिक अपघात, दैनंदिन कामातील किंवा घरी घडलेले अपघात व रेल्वे अपघाताचा यात समावेश नाही.
५)योजनेसंदर्भात कोणतीही तक्रार नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक देखील असेल.
६)राज्य आरोग्य हमी सोसायटी (वरळी) यांच्यामार्फत ही योजना कार्यान्वित होईल.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:33 AM 17-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here