नाचणे येथे तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

0

रत्नागिरी : नाचणे परिसरात तरुणाने घरासमोरील एका खोपट्यात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. अनंत दत्ताराम सुपल (३५, रा. सह्याद्रीनगर नाचणे, रत्नागिरी) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील दत्ताराम बाळकृष्ण सुपल (६६, रा. सह्याद्रीनगर नाचणे, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांना खबर दिली.त्यानुसार मंगळवारी सकाळी ते मुलगा अनंत याला उठवण्यासाठी त्याच्या खोलीकडे जात होते. त्यावेळी त्यांना अनंत हा घरासमोरील खोपट्यामधील लोखंडी पाईपला नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:03 PM 17-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here