माध्यमिक शाळांतील इयत्ता 5 वीचा वर्ग आता प्राथमिक शाळांना जोडणार

0

मुंबई : आता माध्यमिक शाळांतील इयत्ता 5 वी चा वर्ग प्राथमिक शाळांना जोडण्यात येणार व इयत्ता 5 वी वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षकांचे समायोजन प्राथमिक शाळांमध्ये केले जाणार आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णय जाहीर करून सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता प्राथमिक शाळा ही इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवीपर्यंत असणार आहे. तर माध्यमिक शाळेचा प्रवेश आता इयत्ता सहावीपासून घेता येणार आहे. याआधी राज्यातील माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता 5 वी, इयत्ता 6 वी ते 8 वी व 9 वी ते 10 वी अशा तीन गटांमध्ये विद्यार्थी विभागले गेले होते. यामध्ये इयत्ता 5 वी हा एकाच वर्गाचा स्वतंत्र गट तयार झालेला होता. या गटाला माध्यमिक शाळांमध्ये प्राथमिक शाळांचे शिक्षक कार्यरत होते. त्यामुळे आता या शिक्षकांचा समायोजन हे प्राथमिक शाळांमध्ये केलं जाईल.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:25 PM 17-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here