बिबट्याची दहशत राजापूरमध्येही

0

राजापूर : रत्नागिरी आणि लांजा तालुक्यापाठोपाठ राजापूरजवळच्या धोपेश्वर गुरववाडी, नाडणकरवाडी आणि जवळच्या परिसरात बिबट्याचा संचार असल्याने येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जंगलातून बिबट्याच्या डरकाळ्या ऐकू येत असल्याने ग्रामस्थांनी जंगलात गुरे चरण्यासाठी नेणे बंद केले आहे. धोपेश्वर गुरववाडी, नाडणकरवाडीलगत गांगोमंदिरच्या परिसरात बिबट्याचा वावर सुरू आहे. वस्तीपासून काही अंतरावर अरविंद सूद यांचे शेतघर असून तेथे असलेली त्यांची पाळीव जनावरे यापूर्वी बिबट्याने फस्त केली आहेत. सायंकाळनंतर बिबट्याच्या डरकाळ्या ऐकू येतात. दोन दिवसांपूर्वी रात्री शेतघराकडे जाणाऱ्या पायवाटेवर बिबट्या दिसल्याने सूद यांना घरातून बाहेर पडणे धोक्याचे बनले आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:00 PM 17-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here