सकल मराठा समाजाच्यावतीने उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

0

रत्नागिरी : हक्काचे मराठा आरक्षण मिळविण्यासाठी सकल मराठा समाज पुन्हा एकवटला आहे. राज्यात मोठा लढा उभारण्याचा निर्धार समाजाने केला आहे. त्याअनुषंगाने शुक्रवार दि.18 रोजी सकाळी दहा वाजता तालुक्यातील सकल मराठा समाज आंदोलन करणार आहे. मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज आणि समाजाच्या विविध संघटनांच्यावतीने एल्गार पुकारला आहे. आरक्षणासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांच्यामार्फत शासनाला निवेदन देण्यात येणार आहे. निवेदन देण्यासाठी समस्त मराठा बांधवांनी उद्या सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र यावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने करण्यात आले आहे. आंदोलन यशस्वी करण्यासाठी मराठा समाजाच्यावतीने दिनेश सावंत, सुधाकर सावंत, अ‍ॅड. अजय भोसले, संतोष तावडे, केशवराव इंदुलकर, कौस्तुभ सावंत, नंदू चव्हाण आदीसह अनेकजण परिश्रम घेत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:32 PM 17-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here