चीनच्या बोलण्यात आणि करण्यात फरक; त्यांच्या कोणत्याही कारवाईला उत्तर देणार : राजनाथ सिंह

0

नवी दिल्ली : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज राज्यसभेत भारत-चीन सीमेवरील स्थितीची माहिती दिली. संरक्षणमंत्री म्हणाले की, शांतता आणण्यासाठी अनेक करार केले. चीन औपचारिक सीमा स्वीकारत नाही. त्यांच्या बोलण्यात आणि करण्यात फरक आहे. आपल्या जवानांनी गलवान खोऱ्यात चीनला मोठे नुकसान पोहचवले आहे. राजनाथ सिंह म्हणाले की, ‘चीनच्या कोणत्याही कारवाईला उत्तर देणार आहोत. चीनकडून चिथावणीखोर कारवाई करण्यात आली आहे. आपले सैन्य एलएसीवरील कोणत्याही कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी तयार आहे. सैन्य सीमेवर मजबूतीने उभे आहे. चीनकडून सर्वात प्रथम सैन्य कारवाई करण्यात आली होती, मात्र आपण त्यांच्या हेतूमध्ये यशस्वी होऊ दिले नाही. आम्हाला हा प्रश्न शांततेने सोडवायचा आहे आणि चीनने आपल्याबरोबर कार्य करावे अशी आमची इच्छा आहे’.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:54 PM 17-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here