गणेशोत्सवात देवरूखमध्ये एकदिशा वाहतुकीचे नियोजन सुरु

0

देवरुख : देवरुख बाजारपेठेत ऐन गणेशोत्सवात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून एकदिशा मार्ग ठरवले जाणार आहेत. यासाठी नियोजन सुरु झाले आहे. देवरुख शहरातील बाजारपेठेत शिवाजी चौक ते माणिक चौक या भागात सतत वाहतूक कोंडी होत असते. गणेशोत्सवात हा भाग एकदिशा वाहतुकीसाठी ठेवावा की नाही, याबत पाहणी करण्यात आली. शुक्रवारी सकाळी बाजारपेठ व वाहतूक व्यवस्था याचे नियोजन करण्यासाठी पाहणी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा सौ. मृणाल शेट्ये, उपनगराध्यक्ष सुशांत मुळ्ये, मुख्याधिकारी प्रियंका रजपूत, पोलिस उपनिरीक्षिका निशा जाधव, किशोर जोयशी, नगरसेवक प्रफुल्ल भुवड, राजेंद्र गवंडी, माजी उपनगराध्यक्ष अभिजीत शेट्ये उपस्थित होते. माणिक चौकाकडून शिवाजी चौकाकडे जाण्यासाठी मार्ग बंद केला जाण्याची शक्यता आहे. तसेच कायमस्वरुपी एकदिशा मार्ग कोणते ठेवायचे याचेही नियोजन केले जाणार आहे. यासाठी व्यापारी वर्गाची मतेही विचारात घेतली जाणार आहेत. अवजड वाहने सह्याद्रीनगर येथून बाहेरुन नेण्याचा पर्याय सुचवण्यात आला आहे. वाहनचालकांनी आपली वाहने जबाबदारीने पार्किंग करावीत, असेही आवाहन करण्यात आले आहे. बाजारपेठेतील व्यापारी वर्गाने गटारावर माल अथवा फलक लावू नयेत, असेही नगर पंचायतीने कळवले आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here