फणसोप ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांची भूमिपूजने प्रसिद्ध उद्योजक श्री अण्णा सामंत यांचे शुभहस्ते संपन्न

0

रत्नागिरी : फणसोप ग्रामपंच्यायतीच्या कार्यक्षेत्रातील विविध विकास कामांची भूमीपूजने प्रसिद्ध उद्योजक श्री अण्णा सामंत यांचे शुभहस्ते संपन्न झाली यामधे प्रामुख्याने
1.कसोप अंगणवाडी इमारत बांधणे.
2.मनोहर आंग्रे कसोप यांचे घराजवळील रस्ता.
3.कसोप धार येथील पिकअप शेड बांधणे.
4.कसोप सडा येथे संजय कात्रे यांचे घराकडे जाणारा रस्ता .
5.ग्रामपंचायत फणसोप कार्यालयाच्या मागे गणपती विसर्जन साठी चिरेबंदी घाट बांधणे.
6.फणसोप बौद्धवाडी येथील अंतर्गत PVC गटर बांधणे.
या कामांचा समावेश आहे. सदर काम मंजूर होऊन आता लवकरच पूर्ण होणार असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. ही सर्व भूमीपूजने तालुकाप्रमुख श्री बंड्या साळवी,उपजिल्हाप्रमुख श्री बाबू म्हाप,सभापती प्राजक्ता पाटील, नंदा मुरकर,पंचायत समिती सदस्य प्रेरणा पांचाळ,सरपंच गिरीराज (बाबा ) साळवी,उपसरपंच तेजश्री साळवी,मनोज साळवी,युवा अधिकारी तुषार साळवी, उपतालुकप्रमुख राकेश साळवी,नंदा मुरकर,आशु तोडणकर, राहुल साळवी,मानकरी संतोष साळवी,नवीन साळवी,सुशील साळवी,हेमंत साळवी,किरण साळवी,कमलाकर साळवी,अशोक गणपत साळवी,महेश वामन साळवी,गजानन तरळ,धनंजय जोशी,मिलिंद कांबळे,विलास कांबळे,देवेन कांबळे,सुहास कांबळे,समीर साळवीआणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:46 PM 17-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here