हातचलाखीने एटीएमची अदलाबदल करून लांबवले ३४ हजार

0

खेड : तालुक्यातील शिवाजी चौक येथील एटीएममधून पैसे काढणाऱ्या महिलेच्या एटीएमची हातचलाखीने अदलाबदल करून अज्ञाताने तिच्या खात्यातून ३४ हजार रूपये काढले. फसवणुकीची ही घटना मंगळवार १५ सप्टेंबर रोजी सकाळी १०.४५ ते ११.३० वा. कालावधीत घडली आहे. याबाबत समीरा अब्दुल्ला गफूर नुरी (४९, रा. डाक बंगला खेड, रत्नागिरी) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, मंगळवारी त्या शिवाजी चौक येथील आय.सी.आय.सी.आय बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी अज्ञाताने त्यांच्या पाठीमागे उभे राहून त्यांचा पिन कोड नंबर बारकाईने पाहून त्यानंतर हातचलाखी करत त्यांच्या एटीएम कार्डशी आपल्या एटीएम कार्डची अदलाबदल केली. काही वेळाने त्या घरी गेल्या असता त्यांना आपल्या बँक खात्यातून पैसे काढण्यात आल्याचा मेसेज आला. तेव्हा त्यांनी आपले एटीएम कार्ड चोरीस तर गेले नाही ना हे पाहिले असता त्यांना आपल्या कार्डऐवजी दुसरेच कार्ड आपल्या पर्समध्ये मिळून आले. तेव्हा त्यांच्या घडला प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक कदम करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:04 AM 18-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here