कुंबळे येथील हॉटेलचे शटर तोडून लांबवले ५ हजार

0

मंडणगड : तालुक्यातील कुंबळे बाजारपेठेतील गणेश हॉटेलच्या शटरचे कुलूप तोडून काऊंटरमधील रोख ५ हजार रुपये लांबवल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात मंडणगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीची ही घटना मंगळवार १५ सप्टेंबर रोजी रात्री ९ ते बुधवार १६ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वा.कालावधीत घडली आहे. याबाबत हॉटेलचे मालक आकाश भिकाजी लोखंडे (२७, रा.कुंबळे मंडणगड, रत्नागिरी) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याने त्यांच्या हॉटेलचे लोखंडी शटरचे कुलूप तोडून हॉटेलच्या काऊंटरमध्ये असलेल्या बँक पासबुकमधील रोख ५ हजार रुपये लांबवले. याप्रकरणी अधिक तपास पोलिस नाईक मोरे करत आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:29 PM 18-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here