रायगडमधील तटकरे भाजपच्या संपर्कात

0

रत्नागिरी : कोकणातील अनेकजण भाजपमध्ये येण्यासाठी इच्छूुक आहेत.त्यांच्याशी चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादीचे जहाज बुडायला लागल्याने सर्वजण भाजपच्या प्रवाहात येत आहेत. रायगडमधील तटकरे आपल्या संपर्कात असून त्यांच्या बाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र, तो निर्णय पक्ष लवकरच घेईल. खा.नारायणराव राणे यांना पक्षाने भाजपमध्ये घेतले तर त्यांचे आम्ही स्वगतच करू, अशी स्पष्ट भूमिका भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केले. रत्नागिरीत ते पत्रकार परिषेदेत बोलत होते. लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीला मोठी गळती लागली आहे. त्याच्याकडील नेते शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश करीत आहे. आम्ही  भाजप मजबूत करण्याचे काम सुरु केले आहे. रायगडमधील तटकरे भाजपाच्या संपर्कात आहेत. कोण तटकरे? हे आता सांगणार नाही. योग्य वेळी ते महाराष्ट्राला दिसेल, असे आ. लाड यांनी सांगितले. गेले दोन दिवस आ. लाड रत्नागिरी जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख यांच्याशी चर्चा सुरु आहे. त्यांचा चांगला  प्रतिसाद मिळत आहे. रत्नागिरी, संगमेश्वर येथे आपल्या बैठका झाल्या आहेत. गुहागरमध्ये आपण दौरा केला. तेथे कारुळ गाव भूस्खलनामुळे स्थलांतरित करण्याची आवश्यकता आहे.  या गावात 38 कुंटुबे आहेत. हे गाव दत्तक घेण्याचा आपला विचार असून त्याबाबत मुख्यमंत्री, जिल्हाधिकार्‍यांना पत्र देणार असल्याचे आ. लाड यांनी सांगितले. येथे आदर्श गाव उभे करण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याचेही आ. लाड म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here