भाजयुमोतर्फे रत्नागिरीत रक्तदान शिबिराचे आयोजन

0

रत्नागिरी : भारतीय जनता युवा मोर्चाची रत्नागिरी शहर आणि तालुका शाखेतर्फे उद्या रविवार दि. २० सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टीतर्फे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त देशभरात १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर हा आठवडा सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून युवा मोर्चातर्फे रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. सर्वांनी सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळत रक्तदान करावे, असे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चातर्फे करण्यात आले आहे. हे शिबिर बीजेपी ऑफिस, आकांशा प्रेसिडेन्सी, प्रमोद महाजन ग्राउंड शेजारी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत होणार आहे. शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या नागरिकांनी आपले नाव नोंदवण्यासाठी अॅड. नीलांजन नाचणकर (8600055565) किंवा पमू पाटील (8552031563) यांच्याशी संपर्क साधावा.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:37 AM 19-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here