देशाला रुग्णालयाची गरज, इंदूमिलचं पुन्हा आमंत्रण आलं तरी जाणार नाही : प्रकाश आंबेडकर

0

मुंबई : ‘इंदूमिलचं पुन्हा आमंत्रण आलं तरी जाणार नाही, देशाला पुतळ्याची गरज नसून रुग्णालयाची गरज आहे. त्यामुळे राज्यात या पैशाचा उपयोग कोरोना सेंटर उभारण्यात करावा’, असं मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडलं. दादर येथील इंदूमिल या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उभारण्यात येणार असून त्याची पायाभरणी काल (18 सप्टेंबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार होती. मात्र, हा कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आला. याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. मात्र, आपल्याला आता आमंत्रण आले तरी या पायाभरणी कार्यक्रमाला आपण जाणार नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:32 AM 19-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here