अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू

0

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील मालघर वाजेवाडी येथे अज्ञात वाहनाची धडक बसून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ५ च्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश अरुण वावरे (वय ३९, मूळ रा.अकोला, सध्यारा,खेड, चिपळूण) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी योगेश होंडा दुचाकीवरून (एमएच-०८-एडी-७४६२) आबलोली ते चिपळूण असा जात होता. तो मालघर वाजेवाडीजवळ आला असता अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. यात योगेशच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला, अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पड्याळ करत आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:52 AM 19-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here