गुहागर येथे एसटीने पेट्रोल पंप सुरू करण्याची मागणी

0

गुहागर : एसटी महामंडळाने उत्पन्नवाढीसाठी इंडियन ऑइलशी केलेल्या करारानुसार राज्यातील ३० आगारांमध्ये पेट्रोल, डिझेल, एलएनजी विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी आणि राजापूरमध्ये एसटी आगारात पेट्रोल पंप सुरू होणार असून तालुक्याचे ठिकाण असूनही पेट्रोल पंप नसलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये एसटीने पेट्रोल, डिझेल विक्री सुरू करावी, अशी मागणी होत आहे. एसटीने उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने उत्पन्नाचा नवा स्रोत म्हणून एसटी लवकरच सर्वसामान्य लोकांसाठी पेट्रोल आणि डिझेलपंप सुरू करीत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर आणि रत्नागिरी या दोन आगारांची निवड करण्यात आली आहे. गुहागर शहर हे तालुक्याचे ठिकाण आहे. जिल्ह्यातील अन्य आठही तालुक्यांच्या ठिकाणी पेट्रोलपंप आहे. गुहागरमध्ये मात्र तालुक्याच्या ठिकाणापासून १० किलोमीटरवर असलेल्या शृंगारतळी येथे पेट्रोल पंप आहे. पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या गुहागरमध्ये येणाऱ्या पर्यटकांना तसेच स्थानिकांनाही शृंगारतळी येथेच जावे लागते. एसटीने पेट्रोल पंप सुरू केल्यास त्याचा फायदा या साऱ्यांनाच होणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:02 PM 19-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here