महाड इमारत दुर्घटनेतील मदतकार्याबद्दल आदिती तटकरे यांच्या हस्ते जवानांचा सन्मान

0

ठाणे : महाडमध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रसंगी ठाणे महानगरपालिकेची टीडीआरएफ आणि अग्नीशमन दलाची दोन पथके तातडीने घटनास्थळी दाखल होवून तेथील मदतकार्य वेगाने सुरू केले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नुकतेच रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते व रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या उपस्थितीत ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दल व आपत्ती प्रतिसाद दलातील जवानांना प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले. हा सत्कार ठाणे अग्निशमन विभागातील उपस्थानक अधिकारी श्री. ओंकार वैती व ठाणे आपत्ती प्रतिसाद दलातील श्री. सचिन दुबे यांनी स्विकारला.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:17 PM 19-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here