रत्नागिरी : अमावस्या दोन दिवसांवर येऊन ठेपली असून समुद्र पुन्हा खवळू लागला आहे. भरतीच्यावेळी लाटांचा मारा किनार्यावर होत आहे. गणपतीपुळे मंदिराच्या संरक्षण भिंतीवरून लाटा मंदिराच्या पायर्यांपर्यंत येत आहेत. किनार्यालगतच्या रस्त्यावरही पाणी येत असल्याने पर्यटकांनी किनार्यापासून लांब राहणेच पसंद केले आहे. सध्या लाटांचा जोर पुन्हा वाढला आहे. गणपतीपुळे मंदिराच्या संरक्षण भिंतीवरून पाणी मंदिराच्या आवारत येत आहे. मंदिर परिसरातून समुद्राचे दर्शन घेण्यासाठी संरक्षक भिंतीपर्यंत जाणार्या पर्यटकांची समुद्राचा रुद्रावतार पाहून पळापळ होत आहे. मिर्या किनार्यावरही लाटांचा जोर आहे. मांडवी जेटीवरही पाणी येत आहे. भाट्ये किनार्यावरही लाटांचा तडाखा बसत आहे.
