चिपळूणला भाजप महिला मोर्चाचे आज आंदोलन

0

चिपळूण : ज्येष्ठ महिला नेत्या नीलम गोंधळी यांच्या नेतृत्वाखाली भाजप महिला मोर्चाचे मंगळवार दि. २२ सप्टेंबर रोजी चिपळूण येथे आंदोलन होणार आहे. दुपारी बारा वाजता चिपळूणच्या प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. महिलांवरील अत्याचाराविरोधात भाजपच्या महिला आघाडीतर्फे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. नीलम गोंधळी यांनी दिली. आंदोलनात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होऊन शासनाचा निषेध करावा आणि अत्याचार रोखण्यासाठी कडक कारवाई करण्यास भाग पाडावे, असे आवाहन सौ. गोंधळी यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:20 AM 22-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here