वृद्धेची सोन्याची माळ लांबविणाऱ्यास अटक

0

चिपळूण : तालुक्यातील गुढे-कोंडवी येथील एका वृद्धेच्या गळ्यातील सव्वा तोळे वजनाची माळ चोरणाऱ्या संशयिताला पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी विलास आत्माराम मोहिते (रा. गुढे कोंडवी) या संशयितावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सरस्वती विष्णू सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १८ सप्टेंबर रोजी सकाळी ५.३० वा.च्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये सरस्वती सावंत या घराच्या बाजूच्या शौचालयात गेल्या असताना व शौचालयाचा दरवाजा बंद करीत असताना संशयिताने त्यांच्या गळ्यातील सोन्याची माळ खेचली व तो पळून गेला. यामध्ये सरस्वती सावंत यांचे ४० हजारांचे नुकसान झाल्याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयिताला अटक केली.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:00 PM 22-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here