साऱ्या जगाची झोप उडवून वूहानमधील नाइट क्लब जोमाने सुरू

0

बीजिंग : चीनमधील ज्या शहरातून कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव जगभरात झाला, त्या वूहानमध्ये आता शाळा आणि महाविद्यालयेच काय नाइटलाइफही सुरू झाले आहे. तिथे रोज पार्ट्याही होत आहेत. वूहानमधून कोरोना विषाणू नष्ट झाला आहे, असा चीनचा दावा आहे. चीनमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोनाचा संसर्ग खूपच कमी झाला आहे. गेल्या ३३ दिवसांत वूहान शहरात कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, असे चीनच्या सरकारचे म्हणणे आहे. वूहान शहरातील सर्व नाइट क्लबही सुरू झाले असून, तिथे पूर्वीप्रमाणे प्रचंड गर्दी होत आहे. 

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:33 PM 22-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here