नरेंद्र मोदींचा जगात डंका; सर्वाधिक प्रभावी व्यक्तींमध्ये समावेश

0

अमेरिकेतील प्रसिद्ध मॅगजिन टाइमने जगातील 100 प्रभावी व्यक्तिमत्वांची सूची जारी केली आहे. यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश आहे. पीएम मोदी यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्‍ड ट्रम्प यांच्यासह सामील करण्यात आलं आहे. या यादीत सामील भारतीयांमध्ये बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना, गूगलचे सीईओ सुंदर पिचाई, एचआयव्हीवर संशोधन करणारे रविंदर गुप्‍ता आणि शाहीन बाग आंदोलनातील सहभागी बिल्किस यांचीही नावे आहेत.

पीएम टाइम मॅगजिनने पंतप्रधान मोदी यांच्याविषयी लिहिलं आहे की, लोकशाहीसाठी सर्वात आवश्यक केवळ स्वतंत्र्यपणे निवडणुका घेणं नाही. कोणाला किती मतं मिळाली केवळ हेच यातून समोर येतं. भारत देश गेल्या 7 दशकांपासून जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. भारतात 1.3 अरब लोकसंख्येत मुस्लीम, शीख, बौद्ध, जैन आदी विविध धर्मांच्या लोकांचा समावेश आहे.टाइम मॅगजिनने यापूर्वी आपल्या एका लेखात पीएम मोदींचं कौतुक केलं होतं. मॅगजिनमध्ये मोदी हॅज युनायटेड इंडिया लाइक नो प्राइम मिनिस्टर इन डेकेड्स म्हणजेच मोदींनी भारताला अशा पद्धतीने एकजूट ठेवलं आहे की जे गेल्या अनेक दशकात कोणीच ठेवू शकलं नाही या शीर्षकाखाली लेख छापण्यात आला होता. यामध्ये लिहिलं होतं की, मोदींच्या सामाजिक स्वरुपातील प्रगतीशील नीतींमुळे तमाम भारतीयांनी ज्यामध्ये हिंदू आणि धार्मिक अल्पसंख्यांक याचा समावेश आहे, ते गरीबीतून बाहेर आले आहेत. ही कोणत्याही गेल्या पिढीच्या तुलनेत अधिक जलद गतीने झालं आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:57 AM 23-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here