रत्नागिरी : शहरातील राजीवडा नाका येथे दोन गटात मारहाण झाल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार देण्यात आली असून १४ ते १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही घटना मंगळवारी रात्री ११.३० वा. सुमारास घडली. रियान मोहंमद हुसेन मिरकर, नाजीद वस्ता, फौजिया वस्ता,ताहिर मुल्ला, इम्रान मुल्ला, रफिक मुल्ला व इतर ९ जण अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यातील नाजीद वस्ता दिलेल्या तक्रारीनुसार,ते मंगळवारी रात्री ११ वा. सुमारास घरातील कचरा टाकण्यासाठी जात होते. त्यावेळी ताहिर मुल्लाने रस्त्यावर पडलेला मासा त्यांच्या अंगावर फेकला.नाजीद यांनी याबाबत त्याला जाब विचारल्याच्या रागातून ताहिर मुल्ला, इम्रान मुल्ला आणि रफिक मुल्ला व इतर ४ ते ५ जणांनी मिळून वस्तांच्या घरात घुसून मारहाण केली. तेवढ्यात त्यांचा मेव्हणा रियान मिरकर हा मधे पडला असता त्यांच्या खिशातील पाकिट हिसकावून घेतले. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रार देण्यात आली असून ताहिर लतिफ मुल्ला यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ताहिर हे मंगळवारी रात्री जेटी ते राजीवडा नाका येत असताना रियान मिरकर,नाजीद वस्ता,फौजिया वस्ता व इतर ३ ते ४ जणांनी त्यांना रस्त्यात अडवले. व तुला व्यवहारासाठी बोलावले असता तू आला का नाहीस, असे विचारत शिवीगाळ करत मारहाण केली.
